
नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईन, घरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावी, गावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.

लोकसंख्या

जि.प.शाळा

लागवडी क्षेत्र
| 1. ग्राम पंचायतची एकूण लोकसंख्या | 1721 (पुरुष – 862, स्त्री – 859, अनु. जाती – 77, अनु. जाती.- 27 व इतर – 1617) |
| 2. एकूण मतदार संख्या | 1357 (पुरुष – 686, महिला – 671) |
| 3. जि. प. शाळा | 2 |
| 4. आंगणवाडी केंद्र | 2 |
| 5. एकूण शेतकरी सख्या | 443 |
| 6. एकूण भौगोलिक क्षेत्र | 462.99 हे.आर. |
| 7. एकूण लागवडी खालील क्षेत्र | 350.50 हे.आर. |
| 8. एकूण ओलिताखालील क्षेत्र | 174.00 हे. आर. |
| 9. एकूण जिरायतीखालील क्षेत्र | 176.70 हे. आर. |
| 10. बचत गट संख्या | 22 |
| 11. विद्युत खांबाची संख्या | 95 |
| 12. एकूण हातपंपाची संख्या | 17 |
| 13. सार्वजनिक विहीरी | 3 |
| 14. जि. प. वरिष्ठ शाळेचे मुख्याध्यापक भजेपार | कु. नालंदा राऊत मॅडम |
| 15. जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भजेपारटोला | श्री. एस. जी. पाटील |
| 16. आंगणवाडी सेविका केंद्र 1 | सौ. सरिताबाई तूरकर |
| 17. आंगणवाडी सेविका केंद्र 2 | सौ. प्रर्मिलाबाई तूरकर |
| 18. भजियापार जवळचे बसस्थानक | किंडगीपार |
| 19. जवळचे रेल्वेस्थानक | आमगाव |

ग्राम पंचायतच्या वतीने नागरिकांना अर्थसहाय्य, जीवनमान सुधारणा आणि मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध योजनांचा लाभ दिला जातो. ज्यापैकी काही महत्वाच्या योजना.

ग्राम पंचायत मध्ये अनेक सामाजपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ज्यामध्ये नागरिकांचा सहभागाने गावाचा विकास साधण्यास मदत मिळते

आम्ही ग्राम पंचायत म्हणून कार्य करताना शासनाच्या वतीने शाबासकीची थाप मिळाली. त्याचे श्रेय गावातील एकी आणि संघटीत राहण्याच्या त्यांचा वृत्तीला जातो.
ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी

सौ. रुख्मिणीताई विठ्ठलप्रसाद ठाकरे
सरपंच

श्री. कमलेश टी. तुरकर
ग्रामपंचायत अधिकारी

श्री. देवेंद्र जिवनलाल राहांगडाले
उपसरपंच

श्री. शशिकुमार भोजराज तूरकर
सदस्य
कृषी कचरा व्यवस्थापन, माती परीक्षण, ठिबक सिंचन व सौरपंप वापर, जैविक शेती, पीक विमा, रोहयोतून सिंचन विहिरी, जनावरांसाठी गोठे, फळबाग, गोबरगॅस वापर, अशा शेती विषयक विविध योजनांवर जनजागृती करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे जे, शेतकरी वर्गासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय आरोग्य,शिक्षण, पाणी, रोहयोतून रोजगानिर्मिती अशा चौफेर बाजूने गावाचा विकास घडविण्याचा प्रयत्न गावाला नवी दिशा देणारा आहे.
लोकचंद तुरकने - ज्येष्ठ शेतकरी
ग्रामपंचायत भजेपार अंतर्गत एकूण चार अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत. या चारही अंगणवाडी केंद्रांची आकर्षक बोलकी पेंटिंग ग्राम पंचायती केलेली असल्याने चिमुकल्यांना हे केंद्र अतिशय आकर्षित करत असून अंगणवाडीच्या जणू भिंतीही बोलू लागल्याची प्रचिती येत आहे. ईतर सुविधा देखील तेवढ्याच जबाबदारीने ग्रामपंचायत पुरवत असून उन्नत गावाचे नागरिक आणि कर्मचारी असल्याचा अभिमान आहे.
सौ. एम एम देवरे - मुख्याध्यापिका जि.प.प्राथ. शाळा
आरोग्य सेवेकडे बारीक लक्ष पर्यावरण, शिक्षण, पाणी, स्वच्छतेबरोबरच आरोग्याच्या सेवेकडे ग्रामपंचायतीचे बारीक लक्ष असते. पाण्याचे नमुने, आरोग्य तपासणी, रोगनिदान व शस्त्रक्रिया शिबिर, रक्तदान शिबिर, शुद्ध पाण्याची उपलब्धता या बरोबरच आरोग्य उपकेंद्रातील भौतिक सुविधा यावर सतत लक्ष असते. याचीच फलश्रुती म्हणजे आरोग्य उपकेंद्राला सुंदर माझा दवाखाना आणि कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेत.
डॉ. दिनेश कटरे - समुदाय आरोग्य अधिकारी
